शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. महाराष्ट्र माझा
Written By वेबदुनिया|

थर्टीफर्स्टची पार्टी मुंबईत 'ऑल नाईट' रंगणार

WD
मुंबईसह ठाण्यात थर्टीफर्स्ट सेलिब्रेशन पार्टी ऑल नाईट रंगणार आहे. मुंबईतील रेस्टॉरंट पहाटे पाच वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास हायकोर्टाने मंगळवारी परवानगी दिली आहे. मात्र, ही परवानगी इनडोअर पार्टीला असेल. तसेच ग्राहकांच्या सुरक्षेचीही जबाबदारी हॉटेल मालकांवरच असेल, असेही कोर्टाने स्पष्ट केले आहे. तसेच ध्वनी प्रदूषण आणि सायलेन्स झोनचे भानही हॉटेल मालकांना ठेवावे लागेल असे कोर्टाने बजावले आहे.

नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी केवळ रात्री दीड वाजेपर्यंतच हॉटेल सुरु ठेवण्याचे आदेश मुंबई पोलिस आयुक्त सत्यपाल सिंह यांनी दिले होता. याविरोधात 'आहार' संघटनेने हायकोर्टात धाव घेतली होती. त्यावर सुनावणी करताना कोर्टाने रेस्टॉरंट पाच वाजेपर्यंत खुली ठेवण्यासाठी हिरवा कंदील दाखवला आहे.