गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. महाराष्ट्र माझा
Written By भाषा|
Last Modified: मुंबई , शनिवार, 29 मार्च 2008 (22:46 IST)

दक्षिण मुंबईत कार दुर्घटनेत सहा जखमी

दक्षिण मुंबईत धोबी तलाव भागात भरधाव कारच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण हरवल्याने सहा जण जखमी झाले. याप्रकरणी तेवीस वर्षीय चालक कार्तिक शहास अटक करण्यात आली आहे.

दक्षिण मुंबईतील स्टील व्यावसायिकाचा मुलगा असलेला कार्तिक क्रिकेट सामना आटोपून टोयोटा कोरोला गाडीत घराकडे परतत असताना त्याचे गाडीवरील नियंत्रण हरवल्याची माहिती पोलिसांनी दिली. यावेळी वीज प्रकल्पावर काम करणार्‍या 'बेस्ट'च्या सहा कर्मचार्‍यांना गाडीने धडक दिली.

जखमीपैकी दोघांना नजीकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले असून इतरांना वैद्यकीय उपचारानंतर सुटी देण्यात आली. शहाने समोच्या वाहनास ओव्हरटेक करताना गाडीवरील नियंत्रण हरवल्याचा दावा केला, मात्र कर्मचार्‍यांनी तो भरधाव वेगात बेजाबाबदारपणे गाडी चालवत होता, असे सांगितले.

पोलिसांनी शहाविरूद्ध बेजाबाबदारपणे गाडी चालवणे, इतरांच्या सुरक्षेस धोका पोहचवणे व जीवितास धोका पोहचवण्यासाठी भारतीय दंडसंहितेअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.