बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By wd|
Last Modified: हैदराबाद , सोमवार, 29 सप्टेंबर 2014 (17:07 IST)

दलित मुलीचा अंघोळ करताना बनविला एमएमएस

आंध्र प्रदेशातील विंजिग्राम येथील एक अल्पवयीन दलित मुलीचा ती अंघोळ करत असताना तिचा एमएमएस तयार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एवढेच नव्हेतर पाच जणांनी तिचा सलग चार महिने लैंगिक छळ केल्याचे पोलिसांनी सांगितले. 
 
पोलिस सूत्रांनुसार, सगळे आरोपी पीडित मुलीच्या घराशेजारी राहतात. पीडिता अंघोळ करतानाचा  आरोपी शिवाजीने व्हिडिओ तयार केला होता. हा व्हिडिओ इंटरनेट आणि सोशल साइट्सवर अपलोड करण्याची धमकी देऊन तो तिला ब्लॅकमेल करत होता. आरोपीने तिला धमकावून त्याच्या मित्राच्या रुमवर नेले. तिथे आरोपी शिवाजीचे प्रसन्नकुमार आणि श्रीकांत हे दोन मित्र आधीच उपस्थित होते. या तिघांनी तिच्यावर बलात्कार केला.
 
मात्र, आरोपींच्या वारंवार होणार्‍या लैंगिक जाचाला कंटाळून पीडितेने तीन दिवसांपूर्वी स्वतःच्या घरातून पळून गेली होती. परंतु आरोपींनी तिला शोधून काढले. परंतु अखेर पीडितेने आई आणि मोठ्या बहिणीला आपबिती कथन केली. पी‍डितेने पोलिसांना दिलेल्या जबाबावरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.