गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

दहीहंडी फोडलीच नाही, तर गुन्हा कसा: ठाकरे

मुंबई- मुंबईत दहीहंडीचा उत्सव साजरा करताना गोविंदा पथकांनी न्यायालयाने दिलेल्या 20 फुटांवर दहीहंडी फोडण्याच्या आदेशाचे उल्लंघन केले नसल्याचे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे. गोविंदा पथकाने नऊ थर रचले असले तरी, नऊ थर रचून हंडी फोडली नसल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार कसा, असा सवाल मनसे अध्क्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला. 
 
मुंबईतील गोविंदा पथकांची भेट घेतल्यानंतर राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत घेतली. यावेळी त्यांनी दलितांच्या अत्याचार थांबविण्यासाठी 56 इंचाच्या छातीवर गोळी झेलण्याची तयारी दाखविणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदींवरदेखील पुन्हा निशाणा साधला. 
 
दलितांवरील अत्याचार थांबविण्याचे मोदींचे हैदराबादमधील वक्तव्य उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर असल्याचे राज यांनी म्हटले. पंतप्रधान यांचे वक्तव्य हे आपल्यासाठी  भावनात्मक आव्हान वाटते आणि आम्ही केलेले वक्तव्य प्रसारमाध्यमांना राजकारण का वाटते. असा सवालही त्यांनी केला.