गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , बुधवार, 24 ऑगस्ट 2016 (11:18 IST)

दहीहंडीविषयी पुनर्विचार याचिका, पुरस्कारवापसी

दहीहंडीविषयी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर गोविंदा प्रतिनिधींनी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे केलेल्या वक्तव्यानंतर गोविंदा पथकांनी यांची भेट घेतली होती. मंगळवारी पुन्हा गोविंदा पथकांच्या प्रतिनिधींनी राज ठाकरे यांची भेट घेऊन या निर्णयाविषयी चर्चा केली. या भेटीत राज यांनी आपली भूमिका कायम राखत उत्सव साजरा करण्यास पाठिंबा दर्शविला. याच धर्तीवर ठाणे येथे नऊ थरांच्या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे.

गेल्या वर्षी गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सर्वाधिक थरांचा विक्रम करणाऱ्या जोगेश्वरीच्या जय जवान मंडळाने आपल्या विक्रमाचे प्रमाणपत्र राष्ट्रपतींना परत देण्याचा निर्णय घेतला आहे.  केवळ पुरस्कारवापसीच्या भूमिकेवर न थांबता, याचिका दाखल करण्यासाठी जय जवानचे पथकाचे प्रशिक्षक संदीप ढवळे यांनी दिल्लीलाही रवाना झाले. न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे सुरक्षेची सर्व काळजी घेऊ, असे आश्वासन जय जवान मंडळाने दिले आहे.