शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

दारूच्या नशेत तरुणीचा ठाण्यात हल्ला, पोलिसाला मारली चापट (व्हिडिओ)

मुंबई- वरळी पोलिस ठाण्यात नशेत चूर एका मुलीने खूप हल्ला केला. नशेत हिने पोलिसाला चापट मारली. अलीकडेच झालेल्या या प्रकरणाचे व्हिडिओ व्हायरल होत आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही तरुणी दारूच्या नशेत गाडी चालवत असताना तिने गाडी डिव्हाइडरवर चढवली. त्यावेळी तिच्याबरोबर कारमध्ये दोन मुले होती. जेव्हा पोलिसाने त्या मुलीला आणि तिच्या दोन साथीदारांना ठाण्यात आणले तर तिने हल्ला सुरू केला. तिने पोलिसांशी उद्दामपणा केला असून हातही उचलला.
 
व्हिडिओत स्पष्ट कळून येत आहे की मुलीवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न चालू असताना ती स्वत:ला सोडवण्याचा प्रयत्न करत कर्मचार्‍यांविरूद्ध असभ्य भाषेचा प्रयोग करत होती.