शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शुक्रवार, 21 नोव्हेंबर 2014 (10:44 IST)

दुष्काळग्रस्तांसाठी केंद्राकडे मदत मागणार- खडसे

राज्यातील दुष्काळग्रस्तांसाठी केंद्रीय नैसर्गिक आपत्ती फंडातून मदत करण्याची मागणी राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी केली आहे. यासाठी एकनाथ खडसे यांनी केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग यांची भेट घेतली. 
 
केंद्राकडे फळबागांसाठी 651 कोटींची मागणी करण्यात आली होती. पैकी 553 कोटी केंद्रानं मान्य केले आहेत. आतापर्यंत राज्यात एक लाख 86 हजार हेक्टर फळबागांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे फळबागांच्या नुकसानभरपाईसाठी केंद्राने मान्यता दिलेली रक्कम लवकर मिळण्याची शेतकर्‍यांची मागणी आहे.
 
महत्वाची बाब म्हणजे राज्यातील 123 तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. तसेच दुष्काळासंदर्भात मुख्यमंत्री 25 नोव्हेंबरला अमरावतीत, तर 27 नोव्हेंबरला औरंगाबादेत बैठक घेणार आहेत.