गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , गुरूवार, 10 सप्टेंबर 2015 (11:08 IST)

दुष्काळाच्या जखमेवर परतीच्या पावसाची फुंकर

दुष्काळाच्या भळाभळा वाहणार्‍या जखमेवर परतीच्या पावसाने फुंकर घातली आहे. संपुर्ण महाराष्ट्रात जोरदार पाऊस सुरु असून यामुळे किमान पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
 
पुणे-मुंबईसह कोकणासह मराठवाडा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात जोरदार पाऊस झाला आहे. दक्षिण द्वीपकल्प आणि मध्य भारतात बुधवारपासून मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून येत्या दोन दिवसांत कोकण व मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली  आहे.
 
देशाच्या दक्षिणेकडे निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील ७२ तासांत गोव्यासह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.