मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By wd|
Last Modified: मुंबई , बुधवार, 29 ऑक्टोबर 2014 (10:36 IST)

दुसरे तरुण मुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे अठरावे नेते असतील मात्र ही शपथ अनेकांनी एकापेक्षा अधिक वेळा घेतलेली आहे हे पाहता ते 27 वे मुख्यमंत्री असतील. फडणवीस यांच्याआधी विदर्भाकडे मुख्यमंत्रिपद 1991 मध्ये होते. त्यावेळी कै. सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री बनले होते. त्यांच्या आधी मारोतराव कन्नमवार तसेच वसंतराव नाईक या वैदर्भीय नेत्यांनी हे पद भूषवले होते. फडणवीस हे काँग्रेसेतर विरोधी पक्षातील तिसरे मुख्यमंत्री असतील. या आधी शिवसेनेचे मुख्यमंत्री म्हणून प्रथम 1995 मध्ये मनोहर जोशी यांनी शपथ घेतली होती तर 1998 मध्ये नारायण राणे हे शिवसेनेचे दुसरे मुख्यमंत्री बनले होते. मात्र त्यांना फक्त सहा महिन्यांचा कार्यकाळ मिळाला होता. ब्राह्मण समाजाचे तिसरे मुख्यमंत्री होण्याचा मान फडणवीस यांना लाभला आहे. 
 
राज्याचे पहिले मुख्यमंत्री भा.द. खेर तसेच मनोहर जोशी हे या समाजाचे मुख्यमंत्री होते. ङ्खडणवीस हे तरुण वयात या पदावर पोहोचणारे दुसरे नेते आहेत. या आदी देशातील सर्वात तरुण मुख्यमंत्री होण्याचा मान शरद पवार यांना मिळाला होता. ते 38 व्या वर्षी काँग्रेसचे सरकार पाडून 1978 मध्ये मुख्यमंत्री बनले होते. त्यांनी काँग्रेसमधील ङ्खुटीर गटाचे नेतृत्व केले होते आणि त्यांना जनता पक्षाचा पा¨ठबा लाभला होता. त्या सरकारमध्ये भाजपचेही लोक होते.
 
अल्प परिचय
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व भारतीय जनता पक्षाचे विद्यमान प्रदेश अध्यक्ष देवेंद्र गंगाधरराव ङ्खडणवीस म्हणजे विद्वत्ता आणि लोकप्रियतेचा मिलाप साधणारे एक दुर्मीळ राजकीय व्यक्तिमत्त्व. नागपूर विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतल्यानंतर त्यांनी व्यवसाय व्यवस्थापनात स्नातकोत्तर पदवी व डी.एस.ई., बर्लिन येथून प्रकल्प व्यवस्थापनाच्या पद्धती व तंत्र या विषयात पदविका मिळविली. नव्वदीच्या दशकात राजकारणात प्रवेश केल्यानंतर अल्पावधीतच त्यांनी मोठा जनाधार प्राप्त केला.
 
देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या जनतेचे प्रतिनिधित्व करत असतानाच पक्षांतर्गत विविध स्तरांवर नेतृत्व केले. नागपूर महानगरपालिकेतून ते सलग दोनदा (1992 व 1997) निवडून आले. नागपूरचे महापौरपद त्यांनी भूषविले. भारतातील आजवरचे दुसरे सर्वात तरुण महापौर अशी त्यांची ख्याती आहे. महापौरपदी पुन्हा निवडून येऊन महाराष्ट्रातून ‘मेअर इन कौन्सिल’चा मान मिळविणारे ते पहिलेच.
 
1999 पासून सलग तीन वेळा ते विधानसभेवर निवडून आले आहेत. 13 वर्षाहून अधिक काळ महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून जनतेचे प्रतिनिधित्व करीत असताना विविध समित्यांवर काम केले आहे. त्यामध्ये अंदाज समिती, नगर विकास व गृहनिर्माणवरील स्थायी समिती, नियम समिती, सार्वजनिक उपक्रम समिती, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणासंदर्भात नेमलेली समिती यांचा समावेश आहे. राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्यावतीने दिला जाणारा ‘उत्कृष्ट संसदपटू’ पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. जागतिक संसदीय ङ्खोरमच्या सचिवपदी ते कार्यरत आहेत.
 
राजकीय टप्पे
1989 वॉर्ड अध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा. 1990 पदाधिकारी, नागपूर शहर पश्चिम. 1992 अध्यक्ष, नागपूर शहर भाजयुमो 1994 प्रदेश उपाध्यक्ष, भाजयुमो 2001 राष्ट्रीय उपाध्यक्ष, भाजयुमो 2010 सरचिटणीस, भाजप, महाराष्ट्र प्रदेश. 2013 अध्यक्ष, भाजप महाराष्ट्र प्रदेश.
 
सामाजिक योगदान
सचिव, ग्लोबल पार्लमेंटेरिअन्स ङ्खोरम ऑन हॅबिटाट ङ्खॉर एशिया रिजन. नागरी पायाभूत सुविधांसाठीचा वित्तपुरवठा आणि राजकीय व्यवस्थापनाच्या मुद्दय़ांबाबत रिसोर्स पर्सन. संयुक्त राष्ट्रांची मान्यता मिळालेल्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, मुंबई, या संस्थेच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य. नाशिक येथील सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी (भोसला मिलिटरी स्कूल) चे उपाध्यक्ष. नागपूर जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य.
 
आंतरराष्ट्रीय ठसा
1999 मध्ये होनोलुलू, अमेरिका येथे इंटरनॅशनल एन्व्हायरमेंट समिटमध्ये सहभाग आणि सादरीकरण. 2005मध्ये अमेरिकेतील वॉशिंग्टन व नॅशविले येथे यू. एस. नॅशनल कॉन्ङ्खरन्स ऑङ्ख स्टेट लेजिस्लेटर्स. 2006मध्ये स्वित्झर्लडमध्ये दावोस येथे आय.डी.आर.सी. युनेस्को डब्ल्यू.सी.डी.आर. यांनी आयोजित केलेल्या ‘डिझास्टर मिटिगेशन अँड मॅनेजमेंट इन इंडिया’ या विषयावरील आंतराष्ट्रीय शिखर परिषदेत सादरीकरण. 2007 मध्ये चीनमध्ये बीजिंग येथे डब्ल्यू.एम.ओ. ई.एस.एस.पी. यांनी आयोजित केलेल्या ग्लोबल एन्व्हायरमेंटल चेंज काँग्रेसमध्ये ‘नॅचरल डिझास्टर्स मिटिगेशन इश्युज ऑन इकॉलिजिकल अँड सोशल रिस्क’ या विषयी सादरीकरण. डेन्मार्कमध्ये कोपेनहेगेन येथे आशिया व युरोपमधील तरुण राजकीय नेत्यांच्या आसेम परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व. 2008 मध्ये अमेरिकेच्या संघराज्य शासनाच्या ईस्ट वेस्ट सेंटरतर्फे आयोजित न्यू जनरेशन सेमिनारमध्ये ‘एनर्जी सिक्युरिटी इश्युज’ या विषयावर शोधनिबंध सादर. 2008 मध्ये ऑस्ट्रेलिया, न्यूझीलँड आणि सिंगापूरला गेलेल्या कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशनच्या उच्चस्तरीय प्रतिनिधीमंडळाचे सदस्य. 2010मध्ये रशियात मॉस्को येथे भेट देणार्‍या इंडो रशिया चेंबर ऑङ्ख कॉमर्सच्या शिष्टमंडळाचे सदस्य, 2011मध्ये युरोपमध्ये क्रोएशिया येथे ‘ग्लोबल पार्लमेंटरियन ङ्खोरम ऑन हॅबिटाट’मध्ये सहभाग. 2012 मध्ये मलेशियामध्ये ‘जी.पी.एच. एशिया रिजनल मीट’मध्ये सहभाग. 2012 मध्ये केनियातील नैरोबी येथे ‘युनायटेड नेशन्स हॅबिटाट’ने निमंत्रित केलेल्या शिष्टमंडळाचे सदस्य.