गुरूवार, 28 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 5 नोव्हेंबर 2014 (16:59 IST)

देवेंद्र सरकारचा कारभार सोशल मीडिावर दिसणार

राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारच्या कारभाराची जनतेपर्यंत माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालय सोशल मीडियाचा वापर करणार आहे. सरकारने घेतलेले महत्त्वाचे निर्णय, मुख्मंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शासकीय कार्यक्रम व छाचित्रे फेसबुक, यू टय़ूब आणि ट्विटरवर लोड करण्यात येणार आहेत. काँग्रेस आघाडी सरकारनेही या माध्मांचा वापर केला होता. पण त्याला जनतेकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे नवीन सरकारच्या कामांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजप सरकारकडून प्रयत्न केले जाणार आहेत.

काही स्वयंसेवी संस्थाचे यासाठी सहकार्य घेण्यात येणार असल्याचे समजते. सध्या माहितीसाठी दूरदर्शन व वृत्तपत्रे या पारंपरिक माध्यमांचा वापर केला जात आहे. यासोबतच देशात 8 कोटी जनता व्हॉट्सअँपच्या माध्यमातून माहितीची देवाणघेवाण करीत आहे. त्याखालोखाल फेसबुक, टय़ूटर आणि यूटय़ूबचा वापर केला जात आहे. राज्यात हे प्रमाण इतर राज्यांपेक्षा अधिक असून यामध्ये तरुणांची संख्या अधिक आहे. त्यामुळे सरकारला लोकाभिमुख करण्यासाठी सोशल मीडिावर भर देण्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने निश्चित केले आहे. राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेले निणर्य जनतेपर्यंत पोहोचल्यास त्याचा या सरकारविषयी चांगला संदेश जाईल हा सोशल मीडियाच्या वापरामागील उद्देश आहे. ट्विटरला शब्दांची मर्यादा असल्यामुळे हे निणर्य कमी शब्दांमध्ये ट्विटरवर लोड करण्यात येतील.