गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. महाराष्ट्र माझा
Written By WD|
Last Modified: धुळे , मंगळवार, 15 एप्रिल 2014 (11:25 IST)

धुळ्याजवक 58 किलो सोने जप्त

धुळे- मुंबई - आग्रा महामार्गावरील सोनगीर जवळ 16  कोटी 87 लाख रूपये किमतीचे 58 किलो सोने जप्त  करण्यात आले आहे. आयकर विभागाच्या भरारी पथकाने ही  कारवाई केली आहे.

दोन व्यक्ती हे सोने घेवून शिरपूरहून मुंबईकडे जात होते.  एम.एच.04 जीसी 8213 या Dost Lx नावाच्या  गाडीत हे सोने नेले जात होते. त्यावेळी आयकर विभागाच्या  भरारी पथकानं गाडी अडवली आणि त्यांच्याकडील सोने  ताब्यात घेतले. दरम्यान, या प्रकरणी दोघांना ताब्यात  घेण्यात आले असून त्यांची सखोल चौकशी सुरू आहे.

सध्या जिल्ह्याधिकारी तसंच निवडणूक विभागाचे अधिकारीही  या चौकशीत सहभागी झाले असून ही गाडी धुळे पोलिस  ठाण्यात जमा करण्यात आली आहे.ऐन निवडणुकीच्या  काळात हे सोने आढळल्याने धुळ्यात राजकीय चर्चाने या  सोन्याचा संदर्भ दिला जात आहे.