गुरूवार, 28 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. महाराष्ट्र माझा
Written By wd|
Last Modified: नवी मुंबई , शुक्रवार, 18 एप्रिल 2014 (16:32 IST)

नवी मुंबईत मूकबधिर मुलीवर गॅंगरेप

कोपरखैरणेजवळ नकोडे मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका मूकबधिर अल्पवयीन सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

मिळालेली माहिती अशी की, नकोडे येथील 17 वर्षीय मूकबधिर पीडित मुलगी आपल्या घरात एकटी होती. याचा फायदा घेत दोन तरुणांनी घरात घुसून मुलीवर सामूहिक बलात्कार केला.

याप्रकरणी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी मुलीची वैद्यकीय चाचणी करून तक्रार नोंदवून घेतली आहे. पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून दुसर्‍याचा शोध सुरु आहे.