गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By

नागपूर जेलमधून 5 गुन्हेगार पळाले

नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातून पाच आरोपी काल सकाळी पळाले. तुरुंगाचे गज कापून सकाळी 7.30 वाजता आरोपी कारागृहातून पळून गेले. या घटनेची माहिती मिळताच नागपूर पोलिसांनी शहराची नाकेबंदी केली आहे. मात्र, अद्याप एकही आरोपी पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
 
पळालेले आरोपी राजा गवस गँगचे सदस्य आहेत. या 5 जणांपैकी 3 जणांवर मोका कायद्यांतर्गत गुन्हे दाखल आहेत. सर्व आरोपींवर 15 ते 25 गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.
 
कडेकोट बंदोबस्त असलेल्या कारागृहातून आरोपी पळाल्यामुळे पोलिसांवर आरोपींना लवकर पकडण्याचा दबाव आहे. दरम्यान, कारागृह अधीक्षक वैभव कांबळे यांचे निलंबन करण्यात आले आहे.
 
फरार आरोपींची माहिती- भिसेन उईके (वय 35, रा. धुमाल शिवनी, मध्य प्रदेश), मोहम्मद खान सलीम (वय 24 रा. मानकापूर, नागपूर), सत्येंद्र गुप्ता (वय 24 रा. कामटी), नेपाली खादी (वय 31 रा. नेपाळ), आकाश ठाकूर (वय 22 रा. कुतुबशहा नगर, गिटीखदान, नागपूर).