शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: नाशिक , शनिवार, 13 सप्टेंबर 2014 (10:59 IST)

नाशिकच्या महापौरपदी मनसेचे अशोक मुर्तडक यांची निवड

नाशिकच्या महापौरपद राखण्यात राज ठाकरे यांच्या मनसेला यश मिळाले आहे.  मनसेचे उमेदवार अशोक मुर्तडक यांची शुक्रवारी महापौरपदी निवड झाली. अपक्ष नगरसेवक गुरमित बग्गा यांची उपमहापौरपदी निवड झाली आहे. मनसेला अपक्षांनी पाठिंबा दिला असून, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीने मनसेला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. 
 
शिवसेना व भाजपशी युती तोडल्याने मनसे एकाकी पडला होता. अखेर मनसेने महापौरपद कायम राखले. अशोक मुर्तडक यांना 75 मते मिळाली. तर महायुतीच्या सुधाकर बजगुजर यांचा दारुण पराभव झाला आहे. सुधाकर बडगुजर यांना 44 मते मिळाली. 
 
अशोक मुर्तडक हे निवृत्त पोलिस अधिकारी आहेत. पोलिस दलातील 20 वर्षांच्या सेवेनंतर मुर्तडक राजकारणात सक्रीय झाले असून त्यांना दोनदा नगरसेवक होण्याचा मान मिळाला आहे.
 
मनसेच्या शशिकांत जाधव, अशोक मुर्तडक, सुदाम कोंबडे, सलीम शेख या चौघांनी अर्ज दाखल केले होते. अंतिम क्षणी राज ठाकरे यांनी अशोक मुर्तडक यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला.