शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated :नाशिक , सोमवार, 13 जानेवारी 2020 (12:01 IST)

नाशिकमध्ये महापूर (फोटो)

नासर्डी नदीच्या दोन्ही पूल पाण्याखाली, साईदर्शन, सुरभी पार्क परिसर पाण्याखाली, वाहतूक बंद नाशिक भगूर वंजारवाडी रस्त्यावरील गराडी नाल्याला पाणी आल्याने लोहशिंगवे, वंजारवाडी गावांशी संपर्क तुटला. वंजारवाडी मार्गे गोंदे रस्ता बंद करण्यात आला आहे. 

नाशिक जिल्ह्यात दिंडोरी तालुक्यात मुसळधार पाऊस, अतिवृष्टी सर्व नदी नाल्यांना महापूर आला आहे, अनेक गावांचा संपर्क तुटला, पिकांचे नुकसान होण्याची भीती, नदी काठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा. 

नारोशंकर मंदीर बुडण्याच्या मार्गावर...सराफ बाजार पाण्याखाली....१९७१ ची पुनरावृत्ती होण्याची शक्यता, सरकारवाड्यापर्यंत पाणी, दुतोंड्या मारूती, रामसेतू पूल बुडाला....शाळा, कॉलेजांना सुट्टी जाहीर...पावसाचा जोर दुपटीने वाढला... कॉलेज रोडचे रस्ते पाण्याखाली, इंदिरानगर, नाशिकरोड, देवळालीलाही झोडपलं....युद्धपातळीवर आपत्ती व्यवस्थापनाच काम सुरू....आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा...अशोक स्तंभ, रामवाडी रस्त्यावर संपूर्ण ट्रफिक जाम......

साभार : बिपीन पांडे