शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By wd|
Last Modified: नंदुरबार , सोमवार, 29 सप्टेंबर 2014 (11:46 IST)

नितीन गडकरी यांनी चव्हाणांवर दागली तोफ

पृथ्वीराज चव्हाण यांना सर्वात अकार्यक्षम मुख्यमंत्री म्हणावे लागेल. त्यांनी संपूर्ण महाराष्‍ट्राची वाट लावली. देशात क्रमांक एकवर असलेला महाराष्ट्र चव्हाणांनी सहाव्या क्रमांकावर नेऊन ठेवला आहे. राज्यातील हजारो शेतकर्‍यांनी आतापर्यंत आत्महत्त्या केल्या आहेत. आघाडी सरकार सिंचन विकास करू शकले नाही तर  राज्याला पुरेशी वीज काय देणार? अशा शब्दांत केंद्रीय परिवहन मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी आघाडी सरकारसह पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर घणाघाती टीका केली.

नंदुरबारमध्ये आयोजित सभेत नितीन गडकरी हे भाजपचे उमेदवार डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रचारार्थ ते बोलत होते. अमरावती- सुरत या रस्त्याच्या चौपदरीकरणाचा तीन महिन्यांत या शुभारंभ करण्यात येईल, अशी घोषणाही गडकरींनी केली. खासदार डॉ. हिना गावित, धुळ्याचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

दरम्यान, काँग्रेसचा व्हायरस जात नाही, तोपर्यंत विकास होणार नसल्याचे गडकरी यांनी नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथे झालेल्या जाहीर सभेत सांगितले.

कॉंग्रेस नावाचा व्हायरस समूळ नष्ट करण्याची वेळ आता आली आहे. राज्यात परिवर्तन घडवून शिवशाही आणण्यासाठी भाजपच्याच पाठीमागे उभे राहा, असेही गडकरी यांनी जनतेला आवाहन केले. सटाणा येथील पाठक मैदानावर झालेल्या सभेत ते बोलत होते.