शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 19 सप्टेंबर 2016 (10:28 IST)

निसर्गाचा चमत्कार पृथ्वीच्या भूभागावर “द आय”

अर्जेटिना या देशात पारणा डेल्टा असलेल्या उत्तर भागात एक निसर्गाचा चमत्कार पहावयास मिळाला आहे. आपल्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही असा प्रकार घडला आहे. त्या परिसरातील एका भागात एक तळे निर्माण झाले असून ते तळे गोल असून त्याच्या परिघाच्या पेक्षा कमी असणारे गोल बेट अगदी मधोमध असून ते चक्क तरंगत असून आपली जागा सुद्धा बदलते. ते पाहताना असा भास होतो की आपण डोळे पाहत आहोत. म्हणून शास्त्रज्ञ तेथे संशोधन करत असून या भागाला आणि प्रोजेक्टला “द आय” म्हणजेच डोळा असे नाव दिले आहे. यामागील असलेले सत्य शोधात आहेत.
या भागाचे विशेष असे की या भागतील अतर्गत बेट अगदी गोल आहे. तर बेटाच्या चारही बाजूला समान पाणी आहे. त्यामुळे अनेक याला परग्रही\वासी यांनी केलेले आहे. असे म्हणू लागले आहे.
 
“आम्ही फार अचंभित झालो आहे की कसे काय एका वर्तुळात दुसरे गोल वर्तुळ बेट तयार झाले असून ते तरंगत आहे.नेमक हे असे कस होतय हे तपासून पाहत आहोत” रिचर्ड पेत्रोनी हायड्रोलिक आणि सिविल इंजिनिअर न्यू यॉर्क यांनी प्रसिद्धी पत्रकात मत व्यक्त केले आहे.
 
पेत्रोनी हे अर्जेटिना येथील फिल्म दिग्दर्शक सेर्गिओ नेयूसपिलेर्ण यांच्या सोबत मिळून आता फिल्म तयार करत आहेत. तर नेमक हे असे कसे घडले असे तपासून पहिले जात आहे.
 
जर “द आय” कोणाला पहायचे असेल तर गुगल मॅप वर 34°15'07.8'S 58°49'47.4"W यावर पहावयास मिळेल.
( अमेरिकन वृतपत्र डेली मेलच्या बातमी नुसार )