गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , मंगळवार, 30 जून 2015 (12:45 IST)

पंकजा मुंडे नंतर आता विनोद तावडे अडचणीत

महाराष्ट्रच्या महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांच्यावर चिक्की घोटाळ्याच्या आरोपानंतर आता राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या खात्यातील 191 कोटी रुपयांच्या कंत्राटात अनियमतता आढळली आहे. राज्याच्या अर्थखात्याने हा प्रकार लक्षात येताच तावडेंनी दिलेले कंत्राट रोखले आहे. 
 
तावडे यांनी शाळेसाठी सुरक्षा उपकरणाच्या खरेदीसाठी कंत्राट न काढता हा ठेका दिला, जेव्हाकी वित्त विभागाने यावर आपली आपत्ती दर्शविली होती. यात प्रत्येक शाळेत अग्निरोधक यंत्र बसवले जाणार होते व हे काम ठाण्यातील कंपनीला देण्यात आले होते. यात प्रत्येक शाळेत तीन अग्निरोधक यंत्र बसवले जाणार होते. विशेष म्हणजे अर्थखात्याच्या परवानगीविनाच हे कंत्राट देण्यात आले. 
 
दरम्यान विनोद तावडे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहे. हा घोटाळा नसून आम्ही पूर्वीच्या सरकारने राबववेल्या प्रक्रियेचे पालन केले, मात्र अर्थखात्यातील वरिष्ठ अधिका-यांनी या प्रक्रियेतील त्रुटी निदर्शनास आणून दिल्याने आम्ही प्रक्रिया थांबवली, यात सरकारचा एकही पैसा खर्च झालेला नाही अशी प्रतिक्रिया विनोद तावडे यांनी दिली आहे.