गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , सोमवार, 30 मार्च 2015 (11:35 IST)

परप्रांतियांचे लोंढे रोखण्याकरिता तरतुद!

मुंबईत येणारे परप्रातियांचे लोंढे रोखण्याकरिता राज्य सरकारने आर्थिक तरतूद केल्याची माहिती पुढे आल्याने आश्यर्च व्यक्त करण्यात येत आहे. २०१५-१६ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात यासाठी आर्थिक तरतुद करण्यात आली आहे.
 
आशिष शेलार यांनी विधानसभेत अर्थसंकल्पावर उपस्थित केलेल्या मुद्दयावर चर्चा होत असताना या विषय उजेडात आला. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत कोणतेही भाष्य केले नाही. दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुकीवर डोळा ठेवून शिवसेनेच्या हातचा परप्रांतीयांच्या लोंढ्यांचा मुद्दा हिसकावून घेण्याकरिता भाजपाने ही खेळी खेळल्याची चर्चा आहे.