गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. महाराष्ट्र माझा
Written By वेबदुनिया|

पाडगावकरांना महाराष्ट्र भूषण प्रदान

MHNEWS
'तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्‍यांच्‍या माळा...' किंवा 'जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा...' या सारख्‍या मधुर गीतांनी मराठी रसिकांच्‍या मनाचा ठाव घेणा-या कविवर्य मंगेश पाडगावकर यांना राज्‍य शासनाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोमवारी प्रदान करण्यात आला. मुख्यमंत्री विलासराव देशमुख, उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्याहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पु.ल.देशपांडे हे या पुरस्‍काराचे पहिले मानकरी होते. त्‍यानंतर हा पुरस्‍कार मिळविणारे पागावकर हे 13 वे मानकरी ठरले आहेत. यावेळी पाडगावकर यांच्या पत्नी यशोदा पाडगावकर, ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांच्यासह सांस्कृतिक कार्यमंत्री अशोक चव्हाण उपस्थित होते.