शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: कोल्हापूर , शुक्रवार, 27 फेब्रुवारी 2015 (12:17 IST)

पानसरेंच्या मारेकर्‍यांना कोणाचेतही संरक्षण : राणे

कॉ. गोविंद पानसरे यांच्या हल्लेखोरांना कोणीतरी संरक्षण देत आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी येथे केला.
 
राणे यांनी कोल्हापूरात येऊन उमा पानसरे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, डॉ. दाभोलकरांचे मारेकरी अजून सापडलेले नाहीत. पानसरेंच्या हत्येबाबतही अजून पोलिसांच्या हाती काहीही लागलेले नाही. याचाच अर्थ हल्लेखोरांना कोणीतरी संरक्षण देत असल्याचे स्पष्ट होत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही तपासाबाबत ठोस पावले उचललेली नाहीत. विधिमंडळात शोकप्रस्ताव मांडण्यासही त्यांनी विरोध केला, याचा अर्थ काय? असे राणे म्हणाले.