शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: पंढरपूर , गुरूवार, 14 जुलै 2016 (11:31 IST)

पालखी सोहळे वाखरीत विसावले

गेली तीन आठवडे श्रीक्षेत्र देहू व आळंदीपासून पी प्रवास करणारे संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराजांसह अन्य पालखी सोहळे बुधवारी सांकाळी शेवटचा मुक्काम असणार्‍या वाखरीत विसावले असून वाटेत माउलींच्या   पालखीचे बाजीराव विहिरीजवळ उभे व गोलरिंगण बुधवारी पार पडले. यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती.
 
आज (गुरुवारी) दशमी दिवशी सर्व पालख्या पंढरीत दाखल होणार आहेत. तत्पूर्वी संतभेटीचा कार्यक्रम वाखरीत होईल. यासाठी पंढरीत आलेल्या पालख्या वाखरीत जगद्गुरू व माउलींना भेटण्यासाठी येतील व यानंतर विठूरायाच्या नगरीत सारे एकत्र येतील. यासाठी प्रशासनाने तयारी केली आहे. बुधवारी सायंकाळी या दोन्ही प्रमुख पालख्या वाखरी मुक्कामी आल्या आहेत. त्यांचे जंगी स्वागत येथील करण्यात आले.