गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , गुरूवार, 21 जानेवारी 2016 (10:31 IST)

पालिकेसाठी भाजपाचा ‘दोस्त दोस्त ना रहा’

सरकारमध्ये भाजपाचा मित्रपक्ष असणार्‍या रासपने महापालिका निवडणुका मात्र स्वबळावर लढविणार असल्याची घोषणा केली. महादेव जानकर यांनी याबाबतची घोषणा केली.
 
जानकर म्हणाले की, रासप आज जरी महायुतीत असली, तरी स्थानिक निवडणुका मात्र स्वतंत्रपणेच लढविणार आहे. मागील महापालिका निवडणुकीत तीन ठिकाणी रासप उमेदवारांनी दुसर्‍या क्रमांकाची मते घेतली. या तीन जागांप्रमाणेच मुंबईतील निवडक ठिकाणी रासप आपले उमेदवार उभे करेल. केंद्रात आणि राज्यात भाजपाची सत्ता आल्यानंतर स्थानिक स्वराज संस्थांमध्येही एकहाती सत्ता मिळवावी, अन्य पक्षांचा टेकू घेऊ नये, असे भाजपा नेत्यांना वाटू लागले आहे. त्यांना घटकपक्षांची आवश्यकता नाही. त्यामुळे रासपनेही महापालिका निवडणुका स्वतंत्रपणे लढविण्याची तयारी केली आहे, असे जानकरांनी सांगितले.