शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: पुणे , बुधवार, 1 एप्रिल 2015 (15:14 IST)

पुण्यात आघाडीचा काडीमोड

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीमध्ये सुरुअसलेली धुसफुस आता उघडपणे सुरु झाली असून पुणे महापालिकेत ती उफाळून आली. विषय समित्यांच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने मनसेला साथ दिल्याने संतप्त झालेल्या शहर कॉँग्रेसने पालिकेतील आघाडीच तोडण्याचा निर्णय घेतला आहे.
 
याबाबत पक्षाच्या बैठकीत निर्णय झाला असून पक्षश्रेष्ठींकडून परवानगी घेऊन अधिकृत घोषणा करण्यात येईल, अशी माहिती विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी दिली.