शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated :पुणे , बुधवार, 5 डिसेंबर 2018 (12:15 IST)

पुण्यात प्रेमी युगूलाची आत्महत्या

शिंदे वस्ती येथे राहणाऱ्या प्रेमी युगुलाने आज पहाटे 3 वाजता रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या केली. मुलगा शुभम चव्हाण वय 21, मुलगी अश्विनी गावडे वय 18 दोघेजण रात्री 10.30 वाजता घरातून बाहेर पडले होते.

ज्यानंतर घरच्यांनी बेपत्ता झाल्याची तक्रार केली होती. दोघांचं प्रेम होतं, पण मुलाचं लग्न ठरलं होतं, म्हणून पळून जाऊन रेल्वे  खाली आत्महत्या केली. शनिवारी पहाटे 3 वाजता दोघांनी रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या केली. 3.30 वाजता दोघांचेही मृतदेह रेल्वे रुळावर सापडले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.