बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: पुणे , शुक्रवार, 19 डिसेंबर 2014 (12:57 IST)

पुण्यात बसप्रवास महागला

पुणे तिथे काय उणे असे अभिमानाने सांगत महागाईतही काहीच उणे न ठेवणार्‍या पुणे शहरात आता बस प्रवासही महागला आहे. पीएमपी प्रशासनाने प्रवाशांना भाडेवाढीचा झटका दिला आहे.
 
पुणे महानगर परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत बसभाडेवाढीला मंजुरी दिली आहे. आता सहा किलोमिटर पुढे पीएमपी बसच्या दरामध्ये पाच ते तब्बल २५ रुपयांची वाढ झाली आहे. दरम्यान, शनिवारपासून ही भाडेवाढ लागू होणार असून त्यामुळे प्रवासी संतप्त झाले आहेत. ही अन्यायी दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी करण्यात येत असून प्रवासी संघटनाही आक्रमक झाल्या आहेत.