गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: पुणे , मंगळवार, 9 फेब्रुवारी 2016 (11:13 IST)

पुण्यातील ठगांकडून अमेरिकन नागरिकांची फसवणूक

संगणकातील व्हायरस काढून देण्याच्या बहाण्याने पुण्यातील ठगांनी लाखो अमेरिकन नागरिकांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा बीपीओ चालविणाºया तिघांना अटक करण्यात आली आहे.

आदित्य रवींद्र राठी (वय २५, रा. बावधन), हरीश नारायणदास खुशलानी (वय २६, रा. पिंपरी) आणि रितेश खुशाल नवानी (वय २९, वाघेरा कॉलनी, पिंपरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यावर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांनी अमेरिकेतील ५ ते १० लाख नागरिकांची फसवणूक केल्याची तक्रार आहे.