शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated :पुणे , शुक्रवार, 27 मे 2016 (15:49 IST)

पैशाचा पाऊस; मुलगी विकत!

पैशाचा पाऊस पाडण्याचं आमिष दाखवून मुलगी विकत घेण्याचा प्रकार बारामतीमध्ये घडलाय. अंधश्रद्धेतून पैशाचा पाऊस पाडण्यासाठी भोंदूबाबाला सहा फूट उंची असणारी अविवाहित मुलगी हवी होती. अशा मुलीचा शोध त्यांनी घेतला. बारामती तालुक्यातील तरडोली इथल्या नववीत शिकणारी मुलगी त्यांना आढळली. या मुलीला विकत घेण्यासाठी त्याने चक्क बोली लावली.

या भोंदूबाबानं त्या मुलीच्या वडिलांकडे मुलगी विकत देण्याची मागणी केली. त्या बदल्यात आठ लाख आणि दहा तोळं सोनं देण्याचं आमिष मुलीच्या वडिलांना दाखवण्यात आलं. या सगळ्या धक्कादायक प्रकारानंतर मुलीच्या वडिलांनी पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी याप्रकरणी अंधश्रद्धा जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत सहाजणांविरोधात गुन्हा दाखल केलाय. या सहाही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.