शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. महाराष्ट्र माझा
Written By वेबदुनिया|
Last Modified: मुंबई , शनिवार, 28 नोव्हेंबर 2009 (17:30 IST)

प्रत्येक जण निर्णय घेण्यास स्वतंत्र- उद्धव

स्मिता ठाकरे यांच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या वृत्तावर भाष्य करताना, शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक जण आपापले निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

या प्रश्नावर मी कोणाला काहीही सांगणार नाही. माझे काम मी करत राहिन, असे उद्धव म्हणाले. त्यांना त्यांचा निर्णय आधी घेऊ दे. मग मी बोलेन, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

उद्धव यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेल्या स्मिता ठाकरे शिवसेना सोडून कॉंग्रेसच्या वाटेवर आहेत. एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत देऊन त्यांनी तसे संकेत दिले आहेत.

या पार्श्वभूमीवर स्मिता यांचे चिरंजीव राहूल यांनीही आज पत्रकारांना त्यांच्या भूमिकेविषयी सांगितले. मात्र ही भूमिका काहीशी मवाळ झाल्याचे वाटते आहे. 'स्मिता कोणत्याही सत्ता स्पर्धेत सहभागी नाही. पण त्यांना राजकारणात पुढे जायचे आहे. पण त्यांच्या इच्छेचा आदर शिवसेनेत केला गेला नाही. पण याचा अर्थ त्यांनी शिवसेना सोडली असा होत नाही, असे राहूल यांनी सांगितले.