शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 29 सप्टेंबर 2016 (09:55 IST)

प्रवासात विसरलेले लाखो रुपयांचे डोळ्यांचे लेंन्स परत

रेल्वे पोलीसांनी  प्रवासी रवासात विसरलेले लाखो रुपयांचे  डोळ्यांचे लेंन्स परत केले आहेत. प्रवासी असलेले धनराज जाधव वय राह भांडुप हे दिनांक २७/९/२०१६ रोजी सायंकाळी ०४/१० वाजता विलेपार्ले रेल्वे स्थानकातून अंधेरी- चर्चगेट लोकलच्या ड्ब्यात बसले होते. .त्यांचेकडील डोळ्यांचे लेंन्स असलेले २५ पाकीटाची बॅग ड्ब्यातील रॅकवर ठेवली होती. मात्र त्यांचा लक्षात ते राहिले नाही आणे  ते दादर रेल्वेस्थानकात उतरून गेले होते. मात्र फास्ट लोकल तोपर्यंत तोपर्यंत लोकल चर्चगेटच्या दिशेने रवाना झाली.
 
प्रवासी जाधव यांनी बॅगची शोधाशोध चर्चगेट स्थानकात केली. परंतु बॅग त्यांना मिळून न आल्याने त्यांनी चर्चगेट येथून जीआरपी  हेल्पलाईनशी संपर्क केला .हेल्पलाइनद्वारे बांद्रा रेल्वे पोलीस ठाण्यांस लोकल,बॅग व डब्याची माहीती पुरविण्यांत आली. तोपर्यंत सदरची लोकल चर्चगेट रेल्वे स्थानकातून पुनश्च अंधेरी कडे निघाली होती .
 
बांद्रा रेल्वे पोलीस ठाण्यांचे पोना सागवेकर,पोशि माने यांनी बांद्रा स्थानकात चर्चगेट- अंधेरी लोकलच्या ड्ब्यातुन प्रवासी जाधव यांची  विसरलेली बॅग ताब्यात घेतली.
 
प्रवासी जाधव यांना डोळ्याचे लेंन्स असलेले २५ बॉक्सची बॅग (एका बॉक्सची किमत रुपये ५०००/- याप्रमाणे) रुपये १,२५,०००/- मालमत्ता परत केली त्यामुळे जाधव यांचे लाखोंचे नुकसान झाले नाही. जाधव यांनी रेल्वे पोलिसांचे आभार मानले आहेत.