बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: पुणे , शुक्रवार, 23 जानेवारी 2015 (12:38 IST)

बिबट्याची कातडी विकणार्‍यांना अटक

बिबट्याची कातडी विक्रीसाठी घेऊन जाणार्‍या दोघांना ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली़ त्यांच्याकडून १ लाख २५ हजार रुपये किमतीची कातडी जप्त केली आहे़  चंदन ताराचंद महेर आणि रमेश आसाराम सपकाळ अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़  हे कातडे तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहे.