शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 24 सप्टेंबर 2016 (10:38 IST)

बिबट्याने मारले छोट्या मुलाला आई समोर नेले उचलून

नाशिक मध्ये बिबट्याने हल्ला केला आहे.या हल्ल्यात बिबट्याने लहान मुलाला त्यांच्या आई समोर उचलून घेऊन जाऊन त्याचा फडशा पाडला आहे.
 
तो पाच वर्षाचा होता. निफाड तालुक्यातील गोदानगरमध्ये संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे.  
 
मृत मुलाचं नाव सार्थक महेश सोळशे असं आहे. सार्थकचे आई-वडील शेतमजूर आहेत. तो त्यांच्यासोबत शेतात गेला होता. मात्र त्याचवेळी तिथे बिबट्याने हल्ला केला. आई-वडिलां समोर  बिबट्याने मुलाला उचलून ऊसाच्या शेतात नेलं होत. या घटनेने मोठा गोंधळ निर्माण झाला आणि लोकांनी बिबट्यावर चाल केली आहे. बिबट्याच्या तावडीतून सार्थकला सोडवण्यासाठी तिथल्या लोकांनी आरडाओरडा केला.  मात्र तोपर्यंत बिबट्याने त्याचा फडशा पाडला होता. 
 
या परिसरातील मानवी वस्तीत बिबट्याचा वावर असल्याची तक्रार गावकऱ्यांनी वनविभागाकडे केली होती. बिबट्यांना पकडण्यासाठी पिंजरे लावण्याची मागणी केली होती. मात्र वनविभागाने काही उपाययोजना करण्याआधीच बिबट्याने हल्ला केला आणि त्यात तीन वर्षांच्या मुलाने जीव गमावला आहे.