गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. महाराष्ट्र माझा
Written By वेबदुनिया|
Last Modified: मंगळवार, 22 नोव्हेंबर 2011 (13:20 IST)

बिहारच्या वॉण्टेडला मुंबईत अटक

तेरा वर्षांपासून वॉण्टेड असलेल्या संजय कालेश्वर पासवान गुन्हेगाराला नुकतीच मुंबईतून क्राईम ब्रँचच्या युनिट नऊच्या अधिकार्‍यांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध बिहारमध्ये अनेक गंभीर गुन्हांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले.

तेरा वर्षांपूर्वी तो बिहारच्या जेलमधून पळून गेला होता. वांद्रे येथे संजय पासवान हा शस्त्रांची देवाणघेवाण करण्यासाठी आला असता त्याला पोलिस पथकाने अटक केली होती. त्याच्याकडून पोलिसांनी एक कट्टा आणि जिवंत काडतुसे हस्तगत केले होते. तपासात त्याने बिहारमध्ये एका ट्रकचालकाची गोळ्या झाडून हत्या केली होती.