शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 20 एप्रिल 2016 (09:48 IST)

बीडमध्ये उष्माघाताने शाळकरी मुलीचा मृत्यू

बीड- दुष्काळग्रस्त बीड जिल्ह्यातील साबळखेड गावात पाण्यासाठी कूपनलिकेवर सतत फेर्‍या मारल्यामुळे 12 वर्षाच्या मुलीचा उष्माघाताने मृत्यू झाला. शाळेला सुटी असल्यामुळे पाणी वाहून आणण्यासाठी घरच्यांना ही शाळकरी मुलगी मदत करत होती. घराजवळच्या कूपनलिकेवरून पाण्यासाठी तिने अनेक फेर्‍या मारल्या होत्या.
 
बीड जिल्ह्याला भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. तेथील लोकांना पाण्यासाठी दाहीदिशा फिरावे लागत आहे. साबळखेड गावातील ग्रामस्थांची हीच अवस्था आहे. कुटुंबातील सर्वच सदस्य पाण्यासाठी ङ्खिरत असल्याचे चित्र गावात आहे. या गावातील पाचवीत शिकणारी मुलगी पाणी आणण्यासाठी घरच्यांना मदत करत होती. भर उन्हात ती घराजवळच असलेल्या कूपनलिकेवरून पाणी वाहून नेत होती. पाण्यासाठी वारंवार ङ्खेर्‍या मारल्याने ती चक्कर येऊन पडली. या मुलीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.