शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 सप्टेंबर 2016 (09:42 IST)

बुडताना वाचवीताना जवानाचा मृत्यू सेल्फित तिघे तर एकूण राज्यात अकरा बुडाले

नाशिक येथे सुट्टी साठी आलेल्या भारतीय लष्करात असलेल्या जवानाचा एकास  बुडताना वाचविताना मृत्यू झाला आहे. नाशिक मध्ये सर्वाधिक ६ विसर्जन वेळी बुडून मृत्यू मुखी पडले. तर राज्यात एकूण आकडेवारीवरून ११ बुडून मृत्यू झाला आहे. यामध्ये वर्धा येथील तीन युवक सेल्फीच्या मोहापाई आपला जीव गमावून बसले
आहेत.

नाशिक जिल्ह्यात विसर्जनावेळी ६ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात घडलेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये सिन्नरमध्ये दोन जण बुडाले, तर घरी आलेल्या आसामच्या जवानांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.नांदेडमध्ये एकाचा मृत्यू झालाआहे. आसाम रायफल्सचा जवानाचं संदीप शिरसाठ नाव आहे . एका बुडणाऱ्या युवकाला वाचविताना संदीप यांचा बुडून मृत्यू झाला आहे. पिंपळदमध्ये एकाचा, मालेगावमध्ये एकाचा तर त्र्यंबकेश्वरमध्ये एकाचा बुडून मृत्यू झाला आहे.

गणपती विसर्जन करताना एकाचा गोदावरी नदी पात्रात बुडून मृत्यू झाला आहे. नांदेड येथील कुंडलवाडी नगर परिषेदेचा कर्मचारी विजय वाघमारे यांचा बूडून मृत्यू झालीची माहिती समोर आली आहे. गणपती विसर्जनासाठी कर्तव्यावर असताना झाला बूडून मृत्यू झाला आहे. अकोला येथेही एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली
आहे.

नाशिक मधील मृतांची नावे  

सिन्नर - रामेश्वर शिवाजी शिरसाठ, वय ३१ आणि संदीप अण्णा शिरसाठ वय २५ वर्ष

त्र्यंबकेश्वर - भूषण हरी कसबे, वय १७ वर्ष

दाभाडी - सुमित कांतिलाल पवार, वय १४ वर्ष

पिंपळद - अमोल साहेबराव पाटील

गंगापूर - रोशन रतन साळवे