शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

भुजबळ नाशिकात बेघर; आलिशान बंगला जप्त

नाशिक- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा नाशिकमधील आलिशान बंगला जप्त करण्यात आल्याने भुजबळ कुटुंबावर बेघर व्हायची वेळ आली आहे. गेल्या गुरुवारी भुजबळांच्या 22 मालमत्तांवर ईडीने टाच आणली होती, त्यात भुजबळ फार्मचाही समावेश आहे.
 
काळा पैसा प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) भुजबळ व त्यांच्या कुटुंबावर सक्तवसुली संचालनालयाने कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत भुजबळ कुटुंबीयांच्या 433 कोटी रुपयांच्या मालमत्तेवर त्यांनी टाच आणली आहे. त्यापैकी 90 कोटी रुपयांची मालमत्तेवर गुरुवारी जप्ती आणण्यात आली होती. त्यात मुंबई, नाशिक आणि अहमदनगरच्या मालमत्तांचा समावेश असल्याचं समजले होते. परंतु, भुजबळ फार्मावरही ईडीने टाच आणल्याचे उघड झाल्याने नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे.
 
भुजबळ फार्म ज्या जागेवर उभे आहे, त्यापैकी साडेतीन एकर जागा वडिलोपार्जित आहे, तर उर्वरित जागा विकत घेऊन त्यावर त्यांनी आलिशान राजवाडा उभा केला आहे. हे बांधकाम बेहिशेबी पैशांतून बांधल्याचा ईडीचा आरोप आहे.