शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , सोमवार, 11 एप्रिल 2016 (15:55 IST)

भुजबळ यांचे आर्थर रोड कारागृहातून मुख्यमंत्र्यांना स्वहस्ताक्षरात पत्र

महात्मा फुले यांच्या शतकोत्तर रौप्यस्मृती वर्षाकडे शासनाचे दूर्लक्ष झाल्याबाबत छगन भुजबळ यांचे आर्थर रोड कारागृहातून मुख्यमंत्र्यांना स्वहस्ताक्षरात पत्र
 
महात्मा फुले यांच्या शतकोत्तर रौप्यस्मृती वर्षाकडे शासनाने अक्षम्य दुर्लक्ष केले असून दि. २८ नोव्हेंबर २०१७ रोजी त्यांच्या पूण्यतिथीला १२५ वर्ष पूर्ण होत असल्याने त्यानिमित्ताने शासनाने वर्षभरासाठी कार्यक्रम आखावे अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी कारागृहातून लिहिलेल्या पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
 
छगन भुजबळ यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ जयंती १४ एप्रिलला असून देशभरात विशेषत: आपल्या राज्यात मोठ्या जल्लोषात साजरी होत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त करुन केंद्र आणि राज्य सरकारने घेतलेल्या या पुढाकाराबद्दल शासनाचे लाख लाख आभार मानले आहे.
 
तसेच थोर समाज क्रांतीकारक महात्मा जोतीराव  फुले यांचे दि. २८ नोव्हेंबर १८९० रोजी निधन होवून यावर्षी १२५ वर्ष पूर्ण होत असल्याने राज्य शासनाने हे शतकोत्तर रौप्यस्मृती वर्ष मोठ्या प्रमाणावर पाळावे अशी विनंती अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या शिष्टमंडळाने यापूर्वी मुख्यमंत्र्यांची भेट घेवून लेखी स्वरुपात मागणी केलेली होती.
 
भूजबळ यांनी आपल्या पत्रात पुढे म्हटले आहे की, परंतु खेद्द पूर्वक म्हणावेसे वाटते की, आपल्या नेतृत्वाखाली शासनाने संपूर्ण दुर्लक्ष करून दि. २८ नोव्हेंबर २०१६ ते दि. २८ नोव्हेंबर २०१७ या काळासाठी काहीही नियोजन केलेले दिसत नाही. अशा प्रकारचे दुर्लक्ष महाराष्ट्राच्या सामाजिक पुरोगामी विचारांचा अवमान करणारे आहे. त्यामुळे राज्य शासनाने म. फुले यांच्या १२५  व्या पूण्यतिथीच्या निमित्ताने अजूनही लक्ष देऊन नियोजनबद्ध कार्यक्रम आखावेत अशी मागणी भूजबळ यांनी आपल्या पत्रात  केली आहे.