शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: औरंगाबाद , बुधवार, 26 नोव्हेंबर 2014 (11:57 IST)

'मराठवाड्यात 1972 पेक्षाही भयानक दुष्काळ'

मराठवाड्यात 1972 पेक्षाही भयानक दुष्काळ आहे. यंदा फक्त 414 मिमी पाऊस झाला. त्यामुळे जनावरांसाठी चारा नाही. दुष्काळस्थिती बघवत नाही. शेतकरी संकटात आहे. राज्य सरकारने दुष्काळ जाहीर करून कर्ज वसुली तात्काळ थांबवावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधीपक्षनेते एकनाथ शिंदे यांनी केली. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते.
 
दोन दिवसांच्या मराठवाडा दौर्‍यावर आलेल्या उद्धव ठाकरेंनी दुष्काळ परिस्थितीचा आढावा घेतला. शेतकर्‍यांच्या भेटी घेतल्या. त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. 
 
दुष्काळग्रस्ताचे प्रश्‍न थेट राज्यपालांसमोर मांडणार असल्याचे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. उपग्रहाने दुष्काळाचा आढावा घेता तर मंत्रिमंडळ कशाला हवे, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना लगावला. शेतकर्‍यांच्या आत्महत्येचे सत्र थांबले पाहिजे, अशी भावनाही उद्धव यांनी यावेळी व्यक्त केली. 
 
खडसे काल अजित पवारांची भाषा बोलत होते आज शरद पवारांची भाषा बोलत आहेत. यापूर्वी शरद  पवार यांनीदेखील बाळासाहेबांवर अशाच प्रकारची टीका केली होती. रताळे कुठे येतात असा सवाल पवारांनी बाळासाहेबांना केला होता. वेळ आल्यास खडसेंवर बाळासाहेबांच्या भाषेतच प्रत्युत्तर देईल असेही उद्धव ठाकरे पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले. सत्तेत सहभागाविषयी उद्धव ठाकरे यांनी बोलने मात्र यावेळी टाळले.