मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , सोमवार, 6 जुलै 2015 (10:56 IST)

मराठी माणून शिवसेनेलाच बहुमत देईल : उद्धव ठाकरे

पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर भाजपची कोंडी करण्याची संधी शिवसेनेनेही सोडली नसून सर्वत्र भ्रष्टारामुळे मराठी माणूस शिवसेनेलाच बहुमत देईल, असे विधान करुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला खिंडीत गाठले आहे.

शिवसेनेला एकहाती सत्ता मिळाली नसतानाही आम्ही आमची वचनपूर्ती करीत आहोत. मात्र, जिकडे पाहावे तिकडे आज भ्रष्टाचार दिसतोय. त्यामुळे मराठी माणूस शिवसेनेला पूर्ण सत्ता देईल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

पावसाळी अधिवेशन तोंडावर असल्याने भाजपा सरकारची कोंडी करण्यासाठी विरोधकांनी जंग जंग पझाडले आहे. असे असताना सत्तेत घटकपक्ष असणाºया शिवसेनेनेही टीकेचे संधी न सोडल्याने भाजपासमोरील अडचणी वाढल्या आहेत.