गुरूवार, 28 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By wd|
Last Modified: नागपूर , बुधवार, 30 जुलै 2014 (11:29 IST)

'महायुतीचे दरवाजे राज ठाकरेंना कायमचे बंद'

महायुतीचे दरवाजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासाठी कायम बंद असल्याचे रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाचे अध्यक्ष आणि खासदार रामदास आठवले यांनी स्पष्ट केले. राज ठाकरे यांना मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न पडत असल्याचेही आठवले यांनी म्हटले आहे. आठवले नागपुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. 
 
महायुतीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाच्या चर्चा सुरु असतानाच, महायुतीची सत्ता आल्यास सत्तेत 15 टक्के भागीदारी आणि राज्य विधान परिषदेच्या चार जागा आपल्या पक्षाला मिळण्याची मागणी आठवले यांनी केली. शिवाय देशाच्या कुठल्याची राज्याचे राज्यपालपद किवा केंद्रशासित प्रदेशाचे नायब राज्यपालपद मिळण्याची मागणी देखील आठवले यांनी यावेळी केली.