शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: नागपूर , सोमवार, 24 नोव्हेंबर 2014 (10:37 IST)

महाराष्ट लवकरच एलबीटीमुक्त

महाराष्ट एलबीटीमुक्त करण्यावर आम्ही ठाम असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली आहे. येत्या एक महिन्यात एलबीटी रद्द करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर येथे बोलतान स्पष्ट केले. स्वतंत्र विदर्भबाबतही आमची भूमिका बदललेली नसल्याची स्पष्टोत्ती त्यांनी दिली.
 
एलबीटी मुद्द्यावर भाजपाने घूमजाव केल्याची तोफ माजी  काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी डागली होती. हिवाळी अधिवेशनात विरोधकांकडून या मुद्यावर गोंधळ होण्याची शक्यता असल्याने गडकरी यांनी पुढाकार घेत याबाबत खुलासा केला आणि एलबीटीबाबतच्या वावड्यांना ‘फुलस्टॉप’ दिला.