शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated :मुंबई , शुक्रवार, 21 नोव्हेंबर 2014 (16:37 IST)

महाराष्टात दुष्काळ

केंद्र सरकारकडे मदत मागणार : मुख्यमंत्री
 
पावसाळ्यात पावसाने दिलेली ओढ आणि अवकाळी पावसाने झोडपल्याने हवालदिल झालेल्या शेतकर्‍यांवर ऐन रब्बीच्या हंगामात दुष्काळाचे संकट ओढावले आहे. राज्यात दुष्काळ परिस्थिती असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनीही मान्य केले असून यावर मात करण्यासाठी केंद्र सरकारकडे मदत मागण्याचा निर्णय राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
 
मराठवाडा आणि विदभात पावसाअभावी खरीप हातून गेले असून अवकाळी पावसाने रब्बी पिकांची हानी झालेली आहे.  ४३ हजार ६६३ गावांपैकी पन्नास पैशांपेक्षा कमी पैसेवारी असणारी सुमारे १९ हजार ५९ गावे आहेत. अशा परिस्थितीत शेतकºयांना आधार देण्यासाठी केंद्र सरकारकडे किमान दीड हजार कोटींची मागणी करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
 
राज्यात स्वयंचलित हवामान केंद्र 
नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकर्‍यांचे होणारे नुकसान टाळण्याकरिता २ हजार ६५ ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्र स्थापन करण्याची कार्यवाही त्वरित करण्याकरिता डिसेंबरपर्यंत निविदा मागवण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी महसूलमंत्री एकनाथ खडसे मराठवाड्याच्या दौºयावर जाणार आहेत. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठकीत दुष्काळ परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे.