गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: पुणे , सोमवार, 29 डिसेंबर 2014 (10:57 IST)

महाराष्टात पुन्हा गारठला

देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची लाटेने महाराष्ट पुन्हा गारठला आहे. नागपूर ६.७ अंश, नाशिकमध्ये ७.२ अंश सेल्सिअस असे तापमान नोंदवत राज्यात पुन्हा थंडीने आगमन केले आहे. बहुतांशी शहरामध्ये तापमान घसल्याने राज्यात पुन्हा थंडीचा कडाका जाणवत आहे.
 
नागपूरचे किमान तापमान सरासरीपेक्षा तब्बल ५.६ अंश सेल्सिअसने कमी झाले होते. विदभार्चे तापमान आज सर्वांत जास्त घटले. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राचे तापमान घटले. पुढील ४८ तासांत राज्याच्या तापमानात आणखी घट होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.