गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: दिल्ली , शुक्रवार, 23 जानेवारी 2015 (12:35 IST)

महाराष्ट्राची ‘वारी’ सज्ज

राजपथावरील प्रजासत्ताक दिनी होणार्‍या पथसंचलनात महाराष्ट्राचा ‘पंढरीची वारी’ हा चित्ररथ सहभागी होणार आहे.
 
प्रजासत्ताक दिली राष्ट्रपती, पंतप्रधान आणि परदेशी पाहुण्यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात देशाच्या विविध राज्यांची संस्कृती व वैशिष्ट्ये दर्शविणारे चित्ररथ सादर करण्याची परंपरा आहे.  यंदा अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्यांच्यासमोर महाराष्टाच्या चित्ररथातून ‘पंढरीची वारी’ सादर करण्यात येणार आहे.