शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By wd|
Last Modified: मुंबई , सोमवार, 21 जुलै 2014 (14:13 IST)

महाराष्ट्राचे उद्योगमंत्री नारायण राणे यांचा राजीनामा

कॉंग्रेसचे ज्येष्‍ठ नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी आज (सोमवार) आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे राणे यांनी राजीनामा सुपुर्द केला.
 
नारायण राणे यांनी यापूर्वीच राजीनामा देण्याची घोषणा केली होती. पक्षश्रेष्ठी सोनिया गांधी तसेच पक्षातील अन्य नेत्यांनी राणेंचे मन वळवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्याचा काही एक उपयोग झाला नाही. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी‍वर राणेंनी राजीनामा देवून आपला पक्षाला अर्थात कॉंग्रेसला मोठा दणका दिला आहे.  
 
नारायण राणे यांनी मुख्यमंत्री चव्हाण यांच्या विरोधात पुन्हा जोरदार आघाडी उघडली आहे. कॉंग्रेसने चव्हाण यांच्या नेतृत्त्वाखाली निवडणूक लढल्यास निकाल हा लोकसभा निवडणुकीपेक्षा वेगळा नसेल, असा इशाराही राणे यांनी दिला आहे. पक्षनेतृत्त्वामुळे आपण राजीनामा दिल्याचे राणे यांनी सांगितले.