शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , शुक्रवार, 6 मे 2016 (14:39 IST)

महाराष्ट्रात गोवंश मांस बंदी कायम

महाराष्ट्रात गोवंश मांस विक्री आणि खाण्यावरील बंदी हायकोर्टाने कायम ठेवली आहे. मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या आजच्या सुनावणीदरम्यान हा निर्णय देण्यात आला.

महाराष्ट्रामध्ये आधीपासूनच गोवंश मांस विक्रीस आणि खाण्यास बंदी आहे. अशा परिस्थितीत जर एखाद्याने अजाणतेपणे बीफ बाळगलं, किंवा परराज्यातून आणलं, तर तो यापुढे गुन्हा ठरणार नाही. याआधी अशा अजाणतेपणे बीफ सेवन करणाऱ्यांना किंवा बाळगणाऱ्यांना मोठ्या शिक्षेस सामोरं जावं लागायचं. पण आता तर आरोपीने बीफ अजाणतेपणे बाळगल्याचं किंवा सेवन केल्याचं सिद्ध केल्यास, तो शिक्षेस पात्र असणार नाही.