बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: पुणे , गुरूवार, 26 फेब्रुवारी 2015 (13:07 IST)

महाराष्ट्रात दुष्काळाच्या झळा

थंडी संपते न संपते तोवरच महाराष्ट्राला दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. मराठवाड्याला पाचवीलाच पुजलेल्या दुष्काळाने यंदा लवकरच डोके काढले आहे. मराठवाड्यातील पाणीसाठा खालावला असून अनेक गावांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
 
यावर्षी राज्यात पावसात उशीरा सुरुवात झाली. सरासरीपेक्षा कमी पाऊस झालाच शिवाय अवकाळी पावसाने झोडपून काढल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आता पिण्याच्या पाण्यासाठीही नागरिकांना भटकंती करावी लागत असल्याचे चित्र आहे. राज्यातील पूर्व भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाणी नसल्याने विहीरी खोल गेल्या आहेत. शेततळ्यांतील तसेच तलावांतील पाणीसाठा झपाट्याने खालावत आहे.
 
दरम्यान, अजून मार्च महिना उगवला नसताना दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने ही परिस्थिती लक्षात घेता राज्य सरकारने त्वरित उपाययोजना करण्याची गरज आहे. मात्र, अजूनही शासनाला जाग आलेली नाही.