शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: पुणे , बुधवार, 12 ऑगस्ट 2015 (14:31 IST)

महाराष्ट्रात पावसाचे जोरदार पुनरागमन

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात पाऊस पुन्हा सक्रीय झाला आहे.  राज्याच्या बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली असून कोकण व विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

उत्तर आंध्रप्रदेश - दक्षिण ओडिशाच्या किनार्‍यालगत असलेल्या पश्चिम-मध्य व वायव्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. परिमाणी राज्यात पाऊस सक्रीय झाला आहे. मुंबईत मुसळधार पाऊस पडू शकतो. विदर्भासह मराठवाडा व मध्य महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवानानशास्त्र विभागाने व्यक्त केली.