गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , सोमवार, 5 ऑक्टोबर 2015 (11:41 IST)

महाराष्ट्रात मुसळधार सुरुच राहणार

परतीच्या मुसळधार पाऊस महाराष्ट्राला झोडपून काढत असून पावसाचा जोर अजून दोन ते तीन कायम राहणार आहे. दरम्यान, वीज कोसळून चाळीसहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

कोकण व मध्य महाराष्ट्रात पावसाने जोर धरला असून विदर्भ व मराठवाड्यात जोर कमी झाला आहे. रविवारी कोकणात जोरदार पाऊस झाला. सोलापूर, सातारा, अहमदनगर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. विदर्भ व मराठवाड्यात मात्र तुरळक ठिकाणीच पाऊस पडला.