मंगळवार, 19 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: पुणे , मंगळवार, 28 जुलै 2015 (10:23 IST)

महाराष्ट्रात वरुणराजाचे दमदार आगमन

पश्चिम बंगाल, राजस्थान आणि कर्नाटकवर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात वरुणराजाचे पुन्हा दमदार आगमन झाले आहे.

पूर्व राजस्थान आणि लगतच्या भागावर असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा जोर वाढला आहे. कर्नाटकपासून केरळपर्यंत असलेले कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे.

या बदलत्या वातावरणाचा परिणाम म्हणून राज्यासह मुंबईत पावसाचा जोर कायम आहे. मुंबईत जोरदार पाऊस सुरु आहे. गेल्या २४ तासांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार ठिकाणी पाऊस पडला. कोकण-गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता असून २८ ते ३१ जुलैदरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज आहे.